जिल्ह्यात दिवसभरात १८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १८१ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १८१ रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १८३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील संख्या ५१ इतकी आहे. आज ग्रामिण भागात १२८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर जिल्हाबाह्य ४ रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील ३ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ४ रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ०४५ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com