जिल्ह्यात दिवसभरात १७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

जिल्ह्यात दिवसभरात १७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात २१९ रुग्णांची करोनावर मात

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह( corona Positive ) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात २१९ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ५६ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ११० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ( Malegaon) ०२ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य १० रुग्णांची नोंद झाली आहे.

आज जिल्ह्यात १० रुग्णांचा मृत्यू( Death of Corona Patients ) झाला आहे. यात ग्रामिण भागातील ०५ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ०५.रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४०४ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com