नाशकात १६३ रुग्णांची करोनावर मात तर आज ‘इतके’ पॉझिटिव्ह

नाशकात १६३ रुग्णांची करोनावर मात तर आज ‘इतके’ पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ७६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १६३ रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ७६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या १६ इतकी आहे.

आज ग्रामिण भागात (Nashik Rural) ५६ रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव मनपा (Malegaon) ० तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक मनपा ०१ व ग्रामीण विभागातील ०१ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा ८ हजार ६२६ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.