जिल्ह्यात दिवसभरात १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १०० रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ( Corona Positive Patients ) संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १५३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १०० रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १५३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ७५ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात ( Malegaon ) ०४ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात ०३ रुग्णांचा मृत्यू झाला( Death of Corona Patients ) आहे. यात ग्रामिण भागातील ०१ रूग्ण आहेत, तर नाशिक शहरातील ०२. व मालेगाव येथील ०० रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ४४४ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com