जिल्ह्यात दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १६२ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात करोना पॉझिटिव्ह (Corona Positive) रूग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दिवसभरात १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मागील चोवीस तासात १६२ रूग्णांनी करोनावर मात केली. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १३४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील (Nashik City) संख्या ५९ इतकी आहे. ग्रामिण भागात (Nashik rural) ६५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

मालेगावात (Malegoan) ०३ रूग्ण आढळले. तर जिल्हाबाह्य ०७ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चारही रुग्णांचा मृत्यू ग्रामिण भागात झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com