जिल्ह्यात दिवसभरात १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १०३ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १३३ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १०३ रुग्णांनी करोनावर मात केली

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात १३३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ७५ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ५३ रुग्ण, मालेगाव मनपा विभागात १ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ४ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आज नाशिक मनपा विभागात एक करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.. (Death of Corona Patient). आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०२ इतकी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com