जिल्ह्यात दिवसभरात ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात १०६ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात ९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ९५ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात १०६ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ९५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) शहरातील संख्या ३० इतकी आहे. आज ग्रामिण भागात ६२ रुग्ण, मालेगाव मनपा विभागात १ रुग्ण तर , जिल्हाबाह्य ०२ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०३ करोना रुग्णाचा मृत्यू झाला (Death Of Corona Patients) यात नाशिक ग्रामीण विभागातील २ रुग्णांचा तर नाशिक शहरातील १ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५९८ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com