जिल्ह्यात दिवसभरात १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात २०९ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
करोना

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात दिवसभरात १२८ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह ( corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात २०९ रूग्णांनी करोनावर मात केली.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १२८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक ( Nashik ) शहरातील संख्या ३५ इतकी आहे. आज ग्रामिण भागात ८९ रुग्ण तर, जिल्हाबाह्य ०४ रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज ०४ करोना रुग्णांचा मृत्यू झाला ( Death Of Corona Patients ) यात नाशिक ग्रामीण विभागातील २ रुग्णांचा तर नाशिक शहरातील २ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा ८ हजार ५९१ इतका झाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com