जिल्ह्यात दिवसभरात 124 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

मागील चोवीस तासात २७७ रुग्णांची करोनावर मात
जिल्ह्यात दिवसभरात 124 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात करोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत सातत्याने घट होत आहे. दिवसभरात १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह (Covid Positive) आले आहेत. मागील चोवीस तासात २७७ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्यात उपचार घेणार्‍या रूग्णांच्या संख्येत घट आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात १२४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यात नाशिक शहरातील (Nashik City) संख्या ५८ इतकी आहे. तर ग्रामिण भागात (Rural) ६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात (Malegoan) एकही रूग्ण आढळला नाही. जिल्हाबाह्य तीन रुग्णांची नोंद झाली आहे .

आज जिल्ह्यात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील ४ नाशिक शहरातील ३ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्यूचा आकडा ८ हजार ३८५ इतका झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com