४० हजाराचे इंजेक्शन काळ्या बाजारात अडीच लाखांत; नाशकात चौघे गजाआड

टाॅसिलीझूमॅब इंजेक्शनचा काळाबाजार
४० हजाराचे इंजेक्शन काळ्या बाजारात अडीच लाखांत; नाशकात चौघे गजाआड

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये रेमडीसीवीरचा काळाबाजार होत असतानाच दुसरीकडे करोना बाधित रुग्णांवर वापरले जाणारे टाॅसिलीझूमॅब इंजेक्शनची अवैधरीत्या विक्री करताना दोन सख्या भावांसह इतर दोघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे. बनावट ग्राहक पाठवत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यांनी रचलेल्या सापळ्यात दोघेही रंगेहाथ पकडण्यात आले...

अधिक माहिती अशी की, ४० हजार रुपये किंमतीचे हे इंजक्शन तब्बत २ लाख साठ हजार रुपयांना विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर रोडवर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सापळा रचला होता.

या कारवाईत संशयित संकेत अशोक सावंत (रा. राजपाल कॉलनी माख्म्लाबाद नाका), प्रणव शिंदे ( रा. पिंपळगाव बसवंत), शुभम आणि अक्षय रौन्दळ दोघे सख्खे भाऊ (रा. सटाणा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या संशयितांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात औषध नियंत्रण किमत कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि औषध निरीक्षक सुरेश देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी कार्यालयात असतना फोन आला.

एकजण इंजेक्शन अधिक बहावाने विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना कळवले. बनावट ग्राहक पाठवत संशयितांना फोन केला. एका इंजेक्शनसाठी दोन लाख ६० हजार रुपये किमंत सांगितली.

पथकाने सापळा रचला. गंगापूर रोडवर एका हॉस्पिटलखाली ग्राहक उभा असताना चारचाकी क्रमांक एमच १५ ए एफ एन ५०५५ त्याठिकाणी आली.

ग्राहकाने इंजेक्शन घेताना हात वर केला असता दबा धरून बसलेल्या पथकाने कारमधील दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत संकेत सावंत, प्रणव शिंदे अशीनावे त्यांनी सांगितले. दोघांकडून इंजेक्शन व बनावट ग्राहकाकडून घेतलेले पैसे जप्त करण्यात आले.

वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे, श्रीराम पवार, विजय लोंढे, नंदकुमार नंदुर्दीकर, मोतीलाल महाजन, बाळा नांद्रे, संतोष मालोदे, यशवंत बेन्द्कुले यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारगुंड, सहायक आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com