दिंडोरीत तीस लाखांचा गुटखा जप्त

दिंडोरीत तीस लाखांचा गुटखा जप्त

ओझे | वार्ताहर | Oze

महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुमारे 29 लाख 70 हजाराचा गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला (Tobacco) गुजरात हुन आयशर ट्रकमधून महाराष्ट्रात (Maharashtra) आणत असताना दिंडोरी पोलिसांनी (Dindori Police) रासेगाव शिवारात (Rasegaon Shivar) पकडला असून वाहनचालकांना अटक करण्यात आली आहे...

आयशर क्र. एम. एच. 09 सीयू 5634 या वाहनाची दिंडोरी पोलिसांनी तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधक केलेला अन्न पदार्थ, सुगंधी गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची गुजरातमधून चोरटी वाहतूक करत महाराष्ट्रात विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे आढळून आले. आयशरमधून सुमारे 29 लाख 70 हजार रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी सलीम यासीन काझी, (32, रा. कर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर,) वाहनचालक रसूल यासीन काझी (30, रा. करकंब ता. पंढरपूर, जि. सोलापूर), व्ही. आर. एल. लॉजीस्टीक सुरत, व्ही. आर. एल.लोनीस्टीक जोधपुर, व्ही. आर. एन.लॉजीस्टीक सोलापुर, उत्पादक पेढी दिनेश फ्राग्रेस, पाली रोड, मोगरा जोधपुर फ्रास नेला मंगला, बंगलोर व दिनेश फाग्रस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुद्देमालासह आयशर जप्त केला असून वाहनचालक व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी योगेश रोहिदास देशमुख (Yogesh Deshmukh) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com