औद्योगिक वसाहतींमधील थकबाकी वसूल करणार

औद्योगिक वसाहतींमधील थकबाकी वसूल करणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एक लाखापेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या घरगुती तसेच व्यवसायिक प्रतिष्ठान यांच्यासमोर ढोल वाजून महापालिका ( NMC )वसुली करत आहे तर दुसरीकडे औद्योगिक वसाहतींमधील ( Industrial Sector ) कंपन्यांनी मनपाचे सुमारे 45 कोटी रुपये थकवले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही मोठी थकबाकी वसूल करण्यासाठी कर आकारणी विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे.

दरम्यान ढोल वादन मोहिमेमुळे मनपाची 4 कोटीहून अधिक रक्कम वसूल झाली आहे. घरपट्टी मनपाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन मानले जाते. यातून मिळणार्‍या निधीतून मुलभूत सुविधा आणि विकासकामे केली जातात.

मात्र, अनेक मिळकतधारक वेळेवर हा कर भरत नसल्याने थकबाकी वाढून मनपाच्या उत्पन्नावर देखील परिणाम होतो. ही थकीत रक्कम वसूल करण्याकरिता कर आकारणी विभागाने शहरातील 1 लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतदारांची विभागनिहाय यादी तयार करून त्यांना आवाहन केले होते. तरीही दुर्लक्ष करणार्‍यांना नोटीसा पाठवल्या होत्या.

त्यानंतर आता थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसूली केली जात आहे. त्यातच सातपूर आणि अंबड औद्योगीक वसाहतीतील अनेक कंपन्यांनी घरपट्टीची तब्बल 45 कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे. अशा थकबाकीदारांकडून वसूली करण्यासाठी मनपाचा कर विभाग एमआयडीसी, जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवणार आहे, असे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com