जि.प. सेवकांचा दरमहा गौरव होणार

कामाप्रती प्रोत्साहान वाढविणे साठीचा हेतू
जि.प. सेवकांचा दरमहा गौरव होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या Zila Parishad सर्व विभागांत कार्यरत असलेल्या गट ब, क आणि ड च्या सेवकांचे कामाप्रती प्रोत्साहान वाढावे, या हेतूने दर महिन्याला उत्कृष्ट काम करणार्‍या सेवकांना best working servants Employees गुणवंत सेवक पुरस्काराने Meritorious Servant Award सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपआयुक्त ज्ञा.द. शिंदे (आस्थापना) यांनी नाशिक विभागातील सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असून सेवक निवडीकरिता समिती स्थापन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ग्रामपंचायत, शिक्षण विभागात काम करणार्‍या ग्रामसेवक, शिक्षक यांना चांगले काम केल्याबद्दल उत्कृष्ठ ग्रामसेवक, तर आदर्श शिक्षक असे पुरस्कार दिले जातात. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेत काम करत असलेल्या गट ब, क आणि ड संवर्गातील सेवकांना देखील उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक व्हावे, सन्मान व पुरस्कार दिला जावा, या हेतूने ही संकल्पना राबविण्याच्या सूचना विभागीय कार्यालयातर्फे देण्यात आल्या आहेत.

नोव्हेंबर 2021 या महिन्यासाठीची निवड 31 डिसेंबरपर्यंत जाहीर करून जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करून पुढील प्रत्येक महिन्याची निवड त्यापुढील महिन्याच्या 10 तारखेपर्यंत करून त्यांचे संकेतस्थळावर नाव प्रसिद्ध होईल, अशी सूचना करण्यात आली आहे. यापूर्वी सन 2015-16 वर्षामध्ये तत्कालीन अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांनी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराची सुरुवात केली होती. तसा कार्यक्रमही दोनदा झाला. मात्र, चुंभळे पायउतार झाल्यानंतर प्रशासनाने हे पुरस्कारच बंद केले.

अशी राहील समिती

जिल्हा परिषदेतील गट क आणि ड संवर्गातील एक सेवक व गट ब संवर्गातील एक अधिकारी यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव व इतर खातेप्रमुख यांचा या समितीत समावेश असेल.

असे असणार समितीचे कामकाज

समिती ग्रामविकास विभागाच्या गुणवंत अधिकारी, सेवक निवडीच्या धर्तीवर निकष निश्चित करून अधिकारी व सेवक यांची नियुक्ती करतील. त्यासाठी समितीने दर महिन्यात गट अ ते ड संवर्गातील उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, सेवक यांचे दरमहा 5 तारखेपर्यंत प्रस्ताव मागवून त्यातून एक अधिकारी, सेवक यांची दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत निवड करतील. निवड झालेल्या अधिकारी व सेवक यांचे नाव शासकीय व जि.प.च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करतील, तसेच संबंधित अधिकारी व सेवकाच्या उल्लेखनीय कामाची थोडक्यात माहिती त्यांचे छायाचित्र शासकीय संकेतस्थळावर ठेवण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com