पेठ : खैराई लाकडाची तस्करी करणारे वाहन जप्त

पेठ : खैराई लाकडाची तस्करी करणारे वाहन जप्त

एकास अटक

पेठ | Peth

तालुक्यातील आंबे वनपरिक्षेत्रात वनविकास महामंडळाच्या गस्ती पथकाने खैराईच्या लाकडाची तस्करी करणा-या वाहनासह एकाला अटक केली.

आंबे वनपरिक्षेत्रात (दि. ३०) रोजी वनविकास महामंडळाच्या रात्रीच्या जंगल गस्ती पथकास आंबे गावापासुन काही अंतरावर मदळपाडा जवळ एक पिकअप वाहन (एम एच १६.ए ई २१२८) संशयितरीत्या रस्त्याने जात असल्याचा सुगावा लागला.

त्या वाहनास वनविभाग पथकाने शिताफीने या वाहनास पकडले. यातील एकाला पकडण्यात यश आले आहे तर अंधाराचा फायदा घेत गाडीसोबतचे सात ते आठ जण वाहन सोडुन पसार झाले.

सदर वाहनातून पन्नास हजार रुपये खैराई लाकडाचा किंमतीचा मालासह पाच लाख रुपये किमतींचे पिकअप वाहन पथकांने ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com