निलंबन झालं; आर्थिक विवंचनेत तिकीट कंडक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

निलंबन झालं; आर्थिक विवंचनेत तिकीट कंडक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एसटीचा संप चिघळत असून आंदोलन केले म्हणून कामावरून निलंबित केल्याने महिला कर्मचारीने पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशकात घडली. सुदैवाने, लहान बहिणीने वेळीच तत्परता दाखविल्याने जीव या कर्मचाऱ्याचा जीव वाचला. ताई ऐंगोडे असं महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या कंडक्टर पदावर कार्यरत असल्याचे कळते...

आत्महत्या करणारी महिला कर्मचारी पंचवटी डेपोत कामाला आहे. या ठिकाणी तिला तीन महिने निलंबनाची नोटिस देण्यात आली.

या महिलेला आई-वडील नसून लहान बहिणीची जबाबदारी या महिलेवरच आहे. याबाबत एका व्हिडीओ मध्ये या महिलेने सांगितले.

तीन महिने पगार मिळणार नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल. या विवंचनेत या महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले असल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com