बारागाव पिंप्रीत अनोख्या पध्दतीने केली वृक्ष लागवड; जाणून घ्या सविस्तर

बारागाव पिंप्रीत अनोख्या पध्दतीने केली वृक्ष लागवड; जाणून घ्या सविस्तर

पंचाळे । वार्ताहर | Panchale

तालुक्यातील बारागाव पिंपरी (Baragaon Pimpri) येथे सी. ट्री. संस्था व ग्रामस्थांच्या सहकार्याने गायरान जमिनीवर मियावकी पद्धतीच्या (Miyavaki method) प्रकल्पांतर्गत 10 हजार रोपांची लागवड (Planting of seedlings) करण्यात आली आहे.

संस्थेचे ग्राम विकास अधिकारी महेंद्र रेड्डी (Village Development Officer Mahendra Reddy), प्रकल्प प्रमुख शशांक शर्मा, विटेला ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक माणिक गुप्ता, सी. एस. आर. मेहेर, समन्वयक चैतन्य जोशी, ज्ञानेश्वर सुर्वे, पाणी फाउंडेशनचे (Pani Foundation) तालुका समन्वयक अजिंक्य गुरव, गणेश खामकर, विक्रम फाटक यांनी या वृक्ष लागवडीचे नियोजन (Tree planting planning) केले.

26 मार्चपासून वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. आज (दि. 25) एक महिन्यांनंतर या प्रकल्प पूर्ण झाला आहे. मियावकी पद्धतीमध्ये वातावरणानुसार 64 प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली असून त्यात आवळा, हिरडा, निवळी, कडुलिंब, वड-पिंपळ, बोर, आंबा या रोपांचा समावेश आहे. केसर आंब्याच्या 200 रोपांची लागवड करण्यात आली आहे.

या रोपांसाठी ग्रामपंचायतीने जागा, पाणी व संगोपन यांची जबाबदारी घेतली आहे. दोन वर्ष या वृक्षांचे संगोपन (Tree care) करण्याचे काम संस्थेकडे असून संस्थेच्यावतीने झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन सुविधा (Drip irrigation facility) उपलब्ध करण्यात आली आहे. वृक्षलागवडीसाठी सरपंच संध्या कटके, उपसरपंच योगेश गोराडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल उगले, अविनाश कळंबे, विजय उगले, अनिता पानसरे, शीला उगले, बापू घुले, मनीषा उगले, ग्रामसेवक संदीप देवरे यांनी स्वतः लक्ष देऊन यांनी संस्थेला सहकार्य केले.

विविध संस्थांच्या माध्यमातून वृक्ष लागवड पूर्ण होईपर्यंत सामाजिक कार्यकर्ते दशरथ रोडे व विजय उगले यांनी संस्थेस स्थानिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. गावातील गोकुळ गोराडे, निलेश गांगवे, सुभाष नागरे, किशोर उगले, अमोल उगले यांनी जवळपास एक महिनाभर संस्थेत येणार्‍या वृक्ष लागवडीसाठी विविध प्रकारच्या अडचणी सोडविण्यावर भर दिला. समर्थ बचत गटाच्या सदस्य कविता रोडे, साधना रोडे, लता वाणी, लता उगले, अलका उगले, संगीता जाधव यांनी वृक्ष लागवडीसाठी विनामूल्य श्रमदान केले.

मियावकी वृक्ष लागवड पद्धत

मियावकी पद्धत जपानच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली असून एक रोपांंमध्ये दोन ते चार फुटाचे अंतर असते. त्यामुळे घनदाट लागवड होऊन वृक्षांची वाढ मोठ्या प्रमाणात होते. वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण कमी करणे हा या लागवडीचा उद्देश आहे. प्रत्येक रोपास वारा, वादळ यापासून संरक्षण व्हावे म्हणून काठीचा आधार दिला जात

तालुक्यामध्ये प्रथमच एका गावामध्ये 10 हजार रोपांची एकाचवेळी लागवड करुन बारागाव पिंपरी गावाने एक वेगळा विक्रम नोंदवला आहे. या वृक्षलागवडीचा फायदा येत्या चार ते पाच वर्षांमध्ये ग्रामस्थांना होणार असून संस्थेच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर पडली आहे.

- दशरथ रोडे, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com