नायलॉन मांजाने कापला गळा; हेल्मेट व मफरलने वाचवले प्राण

नायलॉन मांजाने कापला गळा; हेल्मेट व मफरलने वाचवले प्राण

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शहरातील लक्ष्मीनारायण लॉन्स (Laxminarayan Lawns) परिसरात राहणार्‍या एकाचा कामावरुन घरी दुचाकीने परतत असताना नायलॉन मांजामुळे (nylon manja) गळा कापल्याची घटना मंगळवारी (दि. 4) सायंकाळच्या सुमारास घडली. हेल्मेट (helmet) व गळ्यात मफरल गुंडाळेली असल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले आहे.

माळेगाव एमआयडीसीतील (Malegaon MIDC) कारखान्यात काम करणारे रमेश शिरसाठ हे सायंकाळी आपले काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना सरदवाडी रोड परिसरात पंतंग (Kite) कट झाल्यानंतर रस्त्यावर पडलेला नायलॉन मांजा (nylon manja) त्यांच्या दुचाकीला आडवा आला. दुचाकीचा वेग बर्‍यापैकी असल्याने त्यांना मांजा दिसला नाही. त्यामुळे हा मांजा थेट त्यांच्या गळ्याला अडकला. त्यांनी तात्काळ वेग कमी करत दुचाकी थांबवली.

मात्र, दुचाकीचा वेग व सहजासहजी न तुटणारा मांजा यामुळे मांजांने थेट त्यांच्या हेल्मेटची दोरी कापून आत असलेल्या मफरलला चिरुन गळ्याला ईजा केली. संक्रात सण (Sankrat Festival) काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरात पतंगप्रेमी आतापासूनच सक्रिय झाले आहेत. मात्र, नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्यांच्याकडून सर्रास मांजाचा वापर केला जात आहे.

सिन्नरसह नाशिक शहरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरु असून असे पंतगप्रेमी थेट नाशिकला जाऊन छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा खरेदी करत आहेत. तर शहरातही काही ठिकाणी छुप्या पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याने चित्र असून अशा विक्रेत्यांसह नायलॉन मांजाचा वापर करणार्‍या पंतगप्रेमींवर नगरपरिषद व पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लहान मुलांना पुढे बसवू नका कामावरुन येताना गळ्याला मांजा अडकला व हेल्मेटची दोरी कापुन आत असलेल्या मफलर मधून गळा कापला गेला. मांजा अडकल्याने मी थेट मागे ओढलो गेलो. सुदैवाने थांबलो म्हणून काही झाले नाही. त्यामुळे दुचाकीधारकांनी शक्यतो हेल्मेट वापरा, गळ्याभोवती नेहमी मफलर किवा जाड़ कपड़ा गुंडाळा. शक्यतो लहान मुलांना दुचाकीवर पुढे बसु नका. शहरात दुचाकी सावकाश चालवा. जेणेकरून मांजा अडकला तरी लगेच थांबता येईल व संकट टळेल.

रमेश शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com