नाशिक-वणी मार्गावर बर्निंग कारचा थरार

नाशिक-वणी मार्गावर बर्निंग कारचा थरार

वणी | Vani

नाशिक-वणी मार्गावर कृष्णगावं नजीक कारने अचानक पेेट घेतल्यामुुुळे परिसरातील ग्रामस्थांनी द बर्निंग कारचा थरार अनुभवला.

आज शुक्रवार दि. ४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास स्वप्नील राजेंद्र आहेर राहणार गंगापूर रोड, नाशिक हे नाशिक ते तिसगाव असा प्रवास करत असतांना त्यांची गाडी Chevrolet Captiva कार क्रमांक MH-12 JK -0700 ने प्रवास करीत असतांना नाशिक ते वणी रस्त्यालगत कृष्णगाव शिवारात गाडीचे बोनेट मधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आले.

तेव्हा स्वप्नील यांनी गाडी रस्ताच्या कडेला लावून ते बाहेर निघाले. तो पर्यंत गाडी पेटून गेली होती. त्यांनतर पोलीसांंनी घटनास्थळी जावुन वणी ग्रामपंचायत येथुन पाण्याचा टक्कर बोलून घेऊन पेडती गाडी विझविण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर काही वेळाने नाशिक येथील अग्नीशामक दल घटना स्थळी येवुन त्यांनी पूर्ण पणे गाडी वर पाणी मारून गाडी विझवली. या प्रकरणी कुठलीही जीवीत हानी झाली नसुन पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com