तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू
नाशिक

तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

दिंडोरी | प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे तीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडुन मृत्यू झाला. लखमापूर येथील मळ्यात चव्हाण कुटुंबीय राहतात.

सकाळी घरा शेजारील पाण्याच्या टाकीत पाणी कमी असल्याने ललित चव्हाण हे मोटार सुरू करण्यासाठी गेले.

त्याचवेळी त्यांचा लहान मुलगा आरुष चव्हाण (वय 3) हा खेळत खेळत पाण्याच्या टाकीत पडला.

पाण्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. वणी येथे शव विच्छेदन सुविधा नसल्याने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आरुषचे शव आणण्यात आले होते. आरुषच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com