लाकूड तस्करी करणारे तिघे ताब्यात

लाकूड तस्करी करणारे तिघे ताब्यात

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

येथील वनविभागाने (Forest Department) नांदगाव (nandgaon), चाळीसगाव (chalisgaon) भागातून लाकडांची चोरटी वाहतूक (Timber smuggling) करणारे तीन ट्रकसह तीन जणांना ताब्यात घेतले.

झाडांची बेकायदा कत्तल (Illegal felling of trees) करून विनापरवानगी वाहतूक केली जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे (Forest Range Officer Vaibhav Diamonds) यांना मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी कर्मचार्‍यांना गस्त (patrolling) घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. चाळीसगाव फाटा-पिलखोड रस्त्यावर तीन संशयीत ट्रक येताच पथकाने त्यांची तपासणी केली असता निंब, केशर, बाभुळ, भोकर प्रजातीच्या वृक्षांची लागडे आढळून आली.

त्यामुळे वन विभागाच्या पथकाने वाहनचालक युनूस मस्तान शेख, सगीर गयास शेख व अरमान गुलाम पठाण या तिघांना ट्रक्ससह ताब्यात घेतले. याबाबत वन विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com