भाजप महिला आघाडीतर्फे तीन हजार वृक्षरोपणाची मोहिम

वटसावित्री पोर्णिमेच्या दिवशी शुभारंभ
भाजप महिला आघाडीतर्फे तीन हजार वृक्षरोपणाची मोहिम

नाशिक | Nashik

येत्या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी शहरात तीन हजार झाडे लावण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षांच्या महीला आघााडीने सोडला आहेे.

पर्यावरण प्रेमींनी नंदिनी नदीला गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून नंदिनी नदीच्या दोन्ही बाजूने नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी नंदिनी नदीच्या तळेगांव (अंजनेरी) येथील उगमस्थानापासून ते टाकळी येथील संगमस्थानापर्यंत दुतर्फा पर्यावरण प्रेमी, एन जी ओ व नाशिक महानगरपालिका यांच्या सयूंक्त विद्यमाने प्रदूषण मुक्त नंदिनी साठी पर्यावरण संरक्षण चळवळीने जोर पकडला आहे. पिंपळगाव बहुला ते टाकळी दरम्यान महापालिकेच्या व पर्यावरण प्रेमी स्वयंसेवक, भाजप पर्यावरण मंच च्या माध्यमातून प्रथम टप्प्यात नंदिनी नदीला कचरा व प्रदूषण मुक्त करण्यासाठी वेगाने काम सुरू असल्याचे माहिती नंदिनी नदी पुनर्जीवन व संवर्धन अभियान प्रमुख भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली.

ते म्हणाले की नाशिक शहर व परिसरातील पर्यावरण प्रेमी संघटना , भाजप पर्यावरण आघाडीचे कार्यकर्ते यांचा उत्साह बघता संपूर्ण देशभरात आदर्श ठरेल व देशभरातील पर्यावरण तज्ञ नाशिक शहराचा कणा असलेली प्रदूषण मुक्त व नाशिककारांचे आकर्षण बनलेली प्रदूषण मुक्त नंदिनी बघायला येतील.

नुकतीच सातपूर येथे नंदिनी नदीच्या पंचक्रोशीत मोजक्याच पर्यावरण प्रेमीच्या उपस्थितीत वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी २४ जून रोजी संपन्न होत असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाची बैठक झााली.

या बैठकीस सुरवातीला उपक्रम प्रमुख लक्ष्मण सावजी यांनी नंदिनी प्रदूषण मुक्त च्या उपक्रमाची माहीती दिली.

आमदार सीमाताई हिरे यांनी नंदिनी नदीच्या गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा असे सांगितले. चिन्मय उदगीरकर यांनी आपण या मोहिमेच्या जनजागरण साठी हिरहिरीने भाग घेऊ असे सांगितले. दिनकर पाटील यांनी वृषारोपन झाल्यावर वृक्ष संवर्धनासाठी योग्य त्या उपाय योजना राबविणासाठी नियोजन करण्यात यावे या साठी आपण सर्वोत्तपरी सहकार्य करू असे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com