खडकमाळेगावला तीन हजार नागरिकांनी घेतली करोना लस

खडकमाळेगावला तीन हजार नागरिकांनी घेतली करोना लस
करोना लस

खडकमाळेगाव । Khadakmalegaon (वार्ताहर)

येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणार्‍या पंधरा गावांतील तीन हजार नागरिकांनी करोना लस घेतली असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित लोणारे यांनी दिली.

खडकमाळेगाव केंद्राअंतर्गत टाकळी विंचूर, उगाव, शिवडी, वनसगाव, नांदुर्डी, खेडे, खानगाव नजिक, सारोळेखुर्द आदींसह पंधरा गावे येत असून या केंद्राच्या वतीने आतापर्यंत 45 वर्षे वयोगटापुढील तीन हजार नागरिकांना करोना प्रतिबंधक लस दिली आहे.

लसीकरणाची नावनोंदणी ऑनलाईन असून त्यानुसारच लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

यासाठी डॉ. पठाण, खैरनार, श्रीमती जाधव, खालकर, केने, पवार, चौधरी, ताजणे, आरोग्य सेविका बेंडकुळे, कासार, मोठे, आवारे, सालके, खैरनार आदी सेविकांचे लसीकरणासाठी मोठे योगदान लाभत आहे.

येथील डॉ. संदीप शिंदे, डॉ. दामिनी रसाळ, डॉ. देशमुख, कुशारे आदी कोविड योद्ध्यांच्या माध्यमातून येथील आरोग्य केंद्रात येणार्‍या रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात असून यासाठी येथील ग्रामपालिकेचेही सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित लोणारे यांच्यासह सेवकांनी म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com