एकाच दिवशी शहर बसने साडे चार हजार हजार प्रवाशी फिरले

दीड दिवसात सव्वा लाखांचे उत्पन्न, सोमवारपासून ४९ बसेस धावणार
एकाच दिवशी शहर बसने साडे चार हजार हजार प्रवाशी फिरले

नाशिक | Nashik

शहर बससेवेला (Nashik City Bus) नाशिककरांकडून प्रतिसाद (Nashik Citizen's Response) मिळ्त असल्याचे दिसून येत आहे. दीड दिवसात 1 लाख 20 हजार पर्यतचे उत्त्पन्न मिळाले आहे. शुक्रवारी (दि.9) 27 बसफेऱ्यातून सायंकाळी सहा वाजेपर्यत साडे चार हजार प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. यातुन 83 हजार 675 पर्यत कमाई केल्याचे चित्र होते.

शुक्रवारी 27 फेर्‍यांच्या माध्यमातून तपोवन डेपोच्या (Tapovan Bus Depo) 134 आणि नाशिकरोड 127 यातुन सायंकाळी सहा वाजेपर्यत 261 फेऱ्या झाल्या. गुरुवारी दुपारनंतर शहर बससेवा सुरु करण्यात आली असून 1200 प्रवाशांद्वारे 37 हजार 400 एवढे उत्पन्न मिळाले. दरम्यान सोमवारी 22 बसेस वाढेविण्यात येणार असून दोन शिफ्ट (Two Shift's) मध्ये 49 बसेस धावणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव (Corona Crisis) सुरु झाल्यापासून दीड वर्षभरापासून एसटी महामंड्ळाची (ST corporation) बस उभीच होती, तोट्यात असल्याने एसटी प्रशासन शहरातर्गत बस चालविण्यास उत्सुक नसल्याचे चित्र होते. अखेर पालिकेने शहर बसेसची जबाबदारी घेत सीएनजीच्या बसेसचे (CNG Buses) उद्घाट्न गुरुवारी करण्यात आले. उदघाटन होताच दुपारपासून शहर बसेस धावण्यास सुरवात झाली. दीड दिवसातच या शहर बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळ्तोय.

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव (Corona Third Wave) कमी झाल्यास पालिकेच्या शहर बसला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. दोन लाख प्रवाशांचे नियोजन असून त्यादुष्टीने आतापासूनच तयारी सुरु झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com