तेरा दिवसात पावणेचार हजार करोना संशयित
नाशिक

तेरा दिवसात पावणेचार हजार करोना संशयित

४ दिवसात १८०० च्यावर संशयित रुग्णालयात

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी

शहरात गेल्या १३ दिवसात ११२४ नवीन करोना बाधीत आढळून आले असुन हे सरासरी प्रमाण ८६ इतके असुन गेल्या चार दिवसात वाढलेले रुग्ण पाहता प्रतिदिन १०० पर्यत नवीन रुग्ण वाढले आहे. हा करोनाचा वाढता ससंर्ग हा अगोदरच्या बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांतून समोर आले आहे. १५ ते १७ जुन या कालावधीत शहरात ३ हजार ७९१ संशयित रुग्णालयात दाखल झाले असुन त्यांच्या घेण्यात आलेल्या नमुन्यातून पॉझिटीव्हचा आकडा दिवसेदिवस वाढत चालल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक शहरातील जुन महिन्यात वाढत असलेल्या करोना संक्रमणाचा वेग पाहता शासकिय यंत्रणा चितेत पडली आहे. शहरात करोना बाधीतांचे प्रतिदिन वेग हा जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १५० पर्यत जाणार असल्याचे आकडेवारी अभ्यासातून समोर आले आहे. गेल्या २४ ते २७ जुन या कालावधीत १५६, ७७, ९१ व १२१ अशाप्रकारे नवीन रुग्ण वाढल्यामुळे त्यांच्या संपर्कातील संशयित मोठ्या प्रमाणात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बाधीतांच्या कुटुबांतील व जवळचे नातेवाईक व मित्र या अतिजोखमीच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ज्या प्रमाणात संख्येने बाधीतांचा आकडा समोर येत आहे, त्या प्रमाणे एका बाधीतांच्या घरातील साधारण ४ ते ५ व्यक्ती अशाप्रमाणात संशयित दररोज रुग्णालयात दाखल होत आहे. एकुणच आता एका व्यक्तीच्या संपर्कातून अनेक आणि अनेकांच्या संपर्कामुळे बाधीतांचा आकडा दररोज शंभराच्या आसपास पोहतला आहे.

यामुळे आता विविध कारणामुळे नातेवाईक, मित्र परिवाराकडे किंवा बाजारात जातांना गर्दीत मिसळणे यातून करोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे आता शासनाने लॉकडाऊन उठवून दुकाने सम विषम तारखांना उघड्याची परवानगी दिली तरी आता सामाजिक अंतर ठेवणे, मास्क वापरणे, सॅनिटाईजरचा वापर करणे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील रुग्ण वाढत आहे. यामुळे नाशिककरांनी आपली जबाबदार ओळली पाहिजे.

नाशिक शहरातील करोना संशयित स्थिती

* दि. १५ जुन - १६६

* दि. १६ जुन - १०८

* दि. १७ जुन - २३८

* दि. १८ जुन - ३१६

* दि. १९ जुन - २८२

* दि. २० जुन - २१६

* दि. २१ जुन - २६७

* दि. २२ जुन - २२४

* दि. २३ जुन - १६२

* दि. २४ जुन - ४८३

* दि. २५ जुन - ४३२

* दि. २६ जुन - ४३४

* दि. २७ जुन - ४६३

Deshdoot
www.deshdoot.com