नाशिक । Nashik

स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली असून सेनेचे 3 तर भाजपचे 8 सदस्य महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले जाहीर केले आहेत.

नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारी संपत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यमान सदस्यातील भाजपच्या नऊ सदस्यांपैकी एक सदस्य वगळून सेनेचा एक सदस्य निवडीसाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे विशेष महासभा घेण्यात आली. यात नवीन स्थायी सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीनंतर स्थायीतील सत्ताधारी भाजपचे सदस्य संख्याबळ 9 वरुन 8 वर येणार आहे. यामुळे भाजप 8 व सर्व विरोधक सदस्य 8 अशी समसमान स्थिती होणार असल्याने भाजपसमोर सभापती पद टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मात्र भाजपला मनसेनेने जर साथ दिली तर भाजपचा सभापती निश्चित मानला जात असुन विरोधक एकत्र येतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. तसेच सेनेकडुन सभापती पद खेचण्याच्या तयारीत नसल्याचे सांगण्यात येत आहे.