चोरीचा माल उधळायला गेले, पोलिसांनी त्यांना जेरबंद केले !

तीघे ताब्यात, साडेबावीस लाखाचा ऐवज जप्त
चोरीचा माल उधळायला गेले, पोलिसांनी त्यांना जेरबंद केले !

नाशिक । Nashik

अचानक हाती आलेल्या पैशांमधून चैन करण्यासाठी उधळपट्टी (Money laundering)करणार्‍या चोरट्यामुळे घरफोडी करणारे तिघे चोरटे (Three Arrested) पोलीसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 22 ला, 72 हजार 210 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखा युनीट एकच्या (Special City Crime Branch) पथकाने ही कामगिरी बजावली.

गोविंद सुभाष निसाळ (19, रा. वाघाडी), सुधीर उर्फ पंकज भानुदास मोहिते (32, रा. मोरेमळा, पंचवटी), रोशन अशोक निसाळ (19, रा. मिलींदनगर) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 22 लाख 72 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

येवलेकर मळा परिसरात संजय दशपुते (Sanjay Dashpute) यांच्या घरात 24 ते 25 जून दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी 10 लाख रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 12 लाख 68 हजार रूपयांचा ऐवज लंपास(Home Theft) केला होता. गुन्हे शाखेने तपास सुरु केला असता गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक प्रवीण वाघमारे यांना एका चोरट्याची माहिती मिळाली.

ऐपत नसतानाही गोविंद निसाळ हा युवक गेल्या चार पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून त्यास पकडले. त्याच्याकडील चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी उर्वरीत दोघा संशयितांना पकडले. तिघांकडून 12 लाख 90 हजार रुपयांची रोकड, 9 लाख 57 हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, आठ हजार रुपयांचा किंमती ऐवज व 35 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 22 लाख 72 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक रघुनाथ शेगर, महेश कुलकर्णी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक विष्णु उगले, अंमलदार काशिनाथ बेंडकुळे, रवींद्र बागुल, वसंत पांडव, संजय मुळक, येवाजी महाले, प्रवीण कोकाटे, अनिल दिघोळे, विशाल काठे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com