नाशकात चाललंय तरी काय?; एकाच दिवशी तीन घरफोड्या

नाशकात चाललंय तरी काय?; एकाच दिवशी तीन घरफोड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी (Robbery) करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड, असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलेश कालिदास खांदवे (Nilesh Kalidas Khandve) (२९, रा. फ्लॅट नंबर १२, चौथा मजला, श्याम सत्व अपार्टमेंट, थेटे मळा मखमलाबाद, नाशिक) हे (दि.१०) दुपारी दीड वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने घराच्या बाहेर गेले होते.

यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उघडून बेडरूममधील कपाटातील १ लाख २४ हजार ८०० रुपयांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनी अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अहिरे करीत आहेत.

नाशकात चाललंय तरी काय?; एकाच दिवशी तीन घरफोड्या
नाशकात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

दुसऱ्या घटनेत म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रकाश किसन चौधरी (Prakash Kisan Chaudhary) (२७,रा. रो हाऊस नंबर ३, शिव कलश रो बंगलो, ३, इंद्रप्रस्थ नगर, मेघराज बेकरीच्या मागे, अमृत वन उद्यान, पेठ रोड ,नाशिक) हे (दि.१०) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घराबाहेर कामानिमित्ताने गेले.

त्यानंतर सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कडी कोयंडा तोडून सोन्याच्या दागिन्यांसह एलईडी टीव्ही, दोन गॅस सिलेंडर, एक तांब्याचा हंडा व रोख ९ हजार रुपये, असा ३० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार व्ही. जे. भोज करत आहेत.

नाशकात चाललंय तरी काय?; एकाच दिवशी तीन घरफोड्या
खुशखबर! 'सारथी'चे केंद्र नाशिकमध्ये; मागासवर्गीयांना होणार 'असा' फायदा

तिसऱ्या घटनेत मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीत विकास रामदास रोकडे (Vikas Ramdas Rokde) (४५,रा. फ्लॅट नंबर ९, वैष्णवी अपार्टमेंट, दिपाली नगर, विनयनगर रोड, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक) हे (दि.६) रात्री पावणे नऊ वाजेच्या दरम्यान मित्राच्या घरी सहकुटुंब जेवण करण्याकरिता गेले.

यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम, मोबाईल फोन, असा ५० हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वपोनी सुनील रोहकले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज सोनवणे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com