नाशकात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी तीन घरफोड्या

नाशकात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी तीन घरफोड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (Nashik City) तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरपोडी (Robbery) करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत किरण विजयसा टाक (३३, रा. फ्लॅट नंबर १२, कृष्ण रीसी रॉयल डाऊनच्या जवळ, स्वामी नगर, मखलाबाद, नाशिक) यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून बेडरूम मधील कपाटातील २ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरी करून लंपास केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक व्ही. के. माळी करत आहेत.

नाशकात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी तीन घरफोड्या
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; दहा मोटरसायकल जप्त

दुसऱ्या घटनेत सरकार वाडा पोलीस ठाण्याच्या (Sarkarwada Police Station) हद्दीत प्रीतम किशोर देसले (३२,रा. फ्लॅट नंबर २, भारद्वाज अपार्टमेंट, कोतवाल पार्क, त्रंबक रोड, टिळकवाडी, नाशिक) यांच्या फ्लॅटचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरातील ३ हजार ७०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

नाशकात चोरांचा धुमाकूळ; एकाच दिवशी तीन घरफोड्या
नाशिकचे माजी नगरसेवक मातोश्रीकडे रवाना

तर तिसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत बापू हरी ढवळे (२९, रा. रूम नंबर १३/३, सुमित कंपनीच्या मागे, मारुती संकुल, दत्तनगर, अंबड, नाशिक) हे गावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून किचनमध्ये ठेवलेल्या लोखंडी कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह २० हजार रुपये रोख असा ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक उत्तम सोनवणे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com