दिंडोरी येथील कंपनीत तीन करोना बाधित

दिंडोरी येथील कंपनीत तीन करोना बाधित
COVID-19

दिंडोरी । Dindori

दिंडोरी तालुक्यात करोनाचे रुग्ण वाढत चालले असुन पालखेड एमआयडीसीतील रोलिंगमिल कंपनीत तीन कामगार करोना पॉझिटिव्ह निघाले आहे. त्यामुळे पालखेड एमआयडीसीत करोनाचा विळखा घट्ट होत चालल्याचे दिसून येत आहे.

दिंडोरी तालुक्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यापूर्वीही एका कंपनीत करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. आज आलेल्या अहवालामध्ये पालखेड येथील एका कंपनीत तीन कामगार करोना बाधित आढळले.

त्याचप्रमाणे प्रितम बारजवळ एक कामगार, मुरकुटे गल्लीत एक कामगार करोना बाधित आढळले. शिवाजीनगरमध्ये ४३ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली.

आरोग्य यंत्रणेने तत्काळ दिंडोरी शहरात कारवाई सुरु केली आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी संबंधित परिसरात जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com