
नाशिक | Nashik
येवला तालुक्यातील (Yeola Taluka) नगरसूल (Nagarsul) येथील कटके वस्ती परिसरात (Katke Wasti Area) मध्यरात्री सात ते आठ जणांच्या टोळक्याने तीन ठिकाणी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. तसेच या तीनही ठिकाणच्या अनेक जणांना मारहाण करून सुमारे बावीस ते पंचवीस लाख रुपयांची मुद्दल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांच्या टोळीने हैदोस घालत तीन ठिकाणी जबरी लूट केली. त्यानंतर दरोडा (Robbery) टाकलेल्या ठिकाणच्या घरातील लोकांना हत्याराने जबर मारहाण (Beating) केली. यानंतर तीनही ठिकाणावरून सोने, चांदीच्या दागिन्यांसह सुमारे बावीस ते पंचवीस लाख रुपयांची मुद्दल चोरून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचे (Police) पथक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तर जखमींना पुढील उपचारासाठी नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालय, येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि डॉ. चंडालिया रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.