मुंबई-आग्रा महामार्गावर पुन्हा अपघात; ३ जण जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर पुन्हा अपघात; ३ जण जखमी

इगतपुरी | प्रतिनिधी |Igatpuri

तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) गोंदे (Gonde) येथील सॅमसोनाईट कंपनीजवळ (Samsonite Company) आज पहाटे चार वाजेच्या सुमारास चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी होऊन अपघात (Accident) घडला....

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकहुन मुंबईकडे (Nashik to Mumbai) एम एच ४६ एफ ६२०५ हा ट्रक जात असतांना गोंदे सॅमसोनाईट कंपनीजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक खड्ड्यात पलटी झाला. यावेळी ट्रकमधील ओम प्रकाश सिंग (२८) रफिक रहीम खान (४५) दिलीप कुमार सिंग (३९) हे ३ जण जखमी झाले.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात (Ghoti Rural Hospital) दाखल केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com