Nashik Deola News : शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

Nashik Deola News : शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

देवळा | प्रतिनिधी | Deola

तालुक्यातील महालपाटणे (Mahalpatne) येथील गंगावाडी शिवारात (Gangawadi Shivar) शेतीच्या रस्त्याच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली असून या हाणामारीत (Clash) एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश असून जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात (Deola Rural Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मारहाण प्रकरणी देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Nashik Deola News : शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
Maratha Reservation : "फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, माझे मराठे त्यांना संरक्षण देतील"; जरांगे पाटलांचे आवाहन

याबाबत अधिक माहिती अशी, महालपाटणे येथील बापू उखा चव्हाण हे गंगावाडी शिवारातील चारी क्रमांक ११ शिवारात आपल्या कुटुंबासोबत राहत असून त्यांनी शेजारी राहणारे अशोक बाळू देवरे यांची शेती गट न २६३/४ हे ०.३५ गुंठे इतके शेत घेतले आहे. या शेतात ते काल मंगळवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास काम करत असतांना जुन्या भांडणाची कुरापत काढत त्यांच्या शेजारी राहणारे रमेश काशिनाथ देवरे, समाधान काशिनाथ देवरे, भाऊसाहेब काशिनाथ देवरे, प्रमिला रमेश देवरे, गुडाबाई समाधान देवरे, मिनाबाई भाऊसाहेब देवरे, रोशन रमेश देवरे, दर्शन भाऊसाहेब देवरे, उत्तम चिंधा अहिरे, शरद उत्तम अहिरे, समाधान उत्तम अहिरे, निकिता समाधान अहिरे, प्रभाकर चंदा अहिरे, वाल्याबाई प्रभाकर अहिरे या सर्वांनी मिळून हातात लोखंडी गज व काठ्यांनी बापू उखा चव्हाण, बायजबाई बापू चव्हाण, श्रीराम बापू चव्हाण व संकेत चव्हाण यांना शिवीगाळ व दमबाजी करत जबर मारहाण केली.

Nashik Deola News : शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
Nashik News : ब्रिटिशकालीन सावळ-पोवळया घाटातील रस्त्याची मोजणी

दरम्यान, याप्रकरणी शिवाजी उखा चव्हाण यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवळा पोलीस ठाण्यात (Deola Police Station) भादवी कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक पाटील यांच्यासह पोलीस (Police) करत आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Deola News : शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारी; एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली राज्य सरकारची भूमिका, म्हणाले...
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com