ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; मुळानेबारीतील दुर्घटना

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; मुळानेबारीतील दुर्घटना

वणी । Wani

येथील मार्कंड पर्वताच्या (Markand Mountains) पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे भीषण अपघात (accident) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, रस्त्याच्या कामासाठी ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून मजुरांना एक ट्रॅक्टर (Tractor) वणीकडून (Wani) घेऊन येत होता. यावेळी ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरसह दोन्ही ट्रॉली पलटी होऊन समोरुन येणाऱ्या अल्टो कारवर (Alto car) पडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू (death) झाला.

दरम्यान, या अपघातात १० ते १५ जण जखमी (Injured) झालेअसून जखमींना वणी (Wani) येथील ग्रामीण रुग्णालयात (hospital) दाखल करण्यात आले आहे. तसेच अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com