नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला

नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी नाशिकरोड परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बुडून पावल्याची दुःखद घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेला वडनेर येथील वालदेवी नदी पात्रात बुडालेल्या हेमंत कैलास सातपुते या इसमाचा मृतदेह आज सकाळी नऊ वाजता सापडला. तब्बल 16 तासानंतर मृतदेह शोधण्यास अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांना यश आले...

हेमंत कैलास सातपुते हा गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याला वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पाणी जास्त असल्याने त्याचा शोध लागला नाही त्यातच अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. परिणामी आज सकाळी नऊ वाजता स्थानिक नागरी तसेच माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी शोध घेतला असता सदरचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे वडनेर दुमाला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला
Nashik News : चालत्या बसचे टायर निघून कारला धडकले

तर दुसऱ्या एका घटनेत चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणारे प्रसाद सुनील दराडे 18 व त्याचा मित्र रोहित वैद्यनाथ नागरगोजे वय 22 हे दोघे जण चेहडी संगमेश्वर येथील नदीपात्रात श्री गणपती मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेले असता प्रसाद दराडे याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे पाय घसरून तो पाण्यात पडला व डुबू लागला त्याला वाचविण्यासाठी रोहित नागरगोजे यांनी पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही जण पाण्यात बुडाले व वाहून गेले.

नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला
Manipur Violence : मणिपूरमध्ये तणाव कायम! CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला, सुरक्षा रक्षकांचा गोळीबार

त्यानंतर या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी दोघांना बाहेर काढले व तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. प्रसाद हा बिटको महाविद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत आहे. तर रोहित हा सामनगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. या घटनेमुळे सिन्नर फाटा व चेहडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या दोन्ही घटनेप्रकरणी नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशिकरोडला विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा मृत्यू; सोळा तासानंतर वाहून गेलेल्या 'त्या' युवकाचा मृतदेह सापडला
Rain Alert : राज्यात पुढील ७२ तासांत मुसळधार पाऊस बरसणार! 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com