नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

नाशिक - मुंबई महामार्गाजवळील (Nashik-Mumbai Higway) इगतपुरी (Igatpuri) शहर बायपासच्या सह्याद्रीनगरजवळ मंगळवार (दि. १०) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण अपघात (Accident) घडल्याने बोरटेंभे येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. या अपघातामुळे बोरटेंभे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-नाशिक महामार्गावरील पंढरपुरवाडी भागात (Pandharpurwadi Area) रात्री ९ वाजेच्या सुमारास घाटनदेवी येथून बोरटेंभेकडे जाणाऱ्या टांग्याला व मोटार सायकलला एका भरधाव आयशरने जोरदार धडक दिली. या धडकेत बोरटेंभे येथील प्रभाकर सुधाकर आडोळे (२५) कुशल सुधाकर आडोळे (२२) व रोहित भगीरथ आडोळे (१९) हे जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर आयशर चालक फरार झाला असून इगतपुरी पोलीस ठाण्याचे (Igatpuri Police Station) अधिकारी रात्रीपासून त्याचा शोध घेत आहेत. तसेच जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com