Accident News : भरधाव कारची दुचाकीला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

अपघात | Accident
अपघात | Accident

नाशिक | Nashik

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) तलासरी इभाडपाडा येथे दुचाकी आणि आर्टिका कारचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला असून या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू (Death)झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे...

अपघात | Accident
Nashik : शिवशाही बस चालकाची बसमध्येच आत्महत्या

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किशोर कामडी, विक्रम कामडी व सुनील वाडकर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे असून हे तिघे जण दुचाकीवरून (Bike) छत्री बनविणाऱ्या एका कंपनीमध्ये कामासाठी जात होते. यावेळी त्यांची दुचाकी तलासरी इभाडपाडा (Talasari Ibhadpada) येथे आली असता महामार्ग क्रॉसिंग करून गुजरातच्या दिशेने जात असताना भरधाव आर्टिका कारने त्यांना धडक दिली. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात | Accident
बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलीच अव्वल, नाशिकचा निकाल किती?

दरम्यान, अपघातात मयत झालेले वरील तिघे जण नाशिक जिल्ह्यातील हरसूल बारिमाळ (Harsul Barimal) येथील रहिवासी असल्याचे समजते. तसेच या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी दाखल होत मृतदेह (Dead Body) ताब्यात घेतले असून याप्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com