नाशिक : सावकारीच्या जाचामुळेच 'त्या' तिघांची आत्महत्या

10 सावकारांना अटक, 11 जणांचा शोध सूरू
नाशिक : सावकारीच्या जाचामुळेच 'त्या' तिघांची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूरच्या (Satpur) येथील फळविक्रेते असेलेल्या एकाच घरातील तिघांनी सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले होते. त्यांच्या डायरीतील 21 सावकारांपैकी 10 जणांना पोलिसांनी (Police) काल अटक (Arrested) करुन न्यायालयात हजर केले आहे...

अशोकनगर भागात फळविक्रीचा व्यवसाय करणार्‍या राधाकृष्णनगर, श्रमिकनगर येथील दीपक सुपडू शिरोळे व त्यांच्या दोन तरुण मुलांनी एकाच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

नाशिक : सावकारीच्या जाचामुळेच 'त्या' तिघांची आत्महत्या
Video : मुसळगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधताना पोलिसांना त्यांच्या डायरीत 21 सावकारांच्या पैशाची नोंद सापडली होती. त्यातील काही जणांनी पैशासाठी तगादा लावल्याने ही आत्महत्या केल्याचे समोर आले होते.

नाशिक : सावकारीच्या जाचामुळेच 'त्या' तिघांची आत्महत्या
जिल्हावासियांना पुन्हा धुक्याची अनुभूती, पाहा व्हिडीओ...

घटनेचे वृत्त समजताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहीती घेत तपासाला दिशा दिली. त्या अनुषंगाने पोलिसांनी सकाळी 10 सावकारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना कोर्टात नेण्यात येत आहे.

सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र चव्हाण व सतिष घोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com