नाशिकमध्ये टवाळखोरांचा हैदोस; एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण

नाशिकमध्ये टवाळखोरांचा हैदोस; एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नशेत असलेल्या चार टवाळखोरांनी उदय कॉलनी (Uday Colony) परिसरात एका घरातील व्यक्तीकडे पैसे मागितले असतांना त्यांनी पैसे न दिल्याने त्याचा राग येऊन एकाच कुटुंबातील तिघांवर कोयत्याने वार करत त्याच घरातील महिलेची सोन्याची पोत लांबवत दगडफेक केल्याची घटना घडली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि. २१) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मुकुंदा शिवराम गुडदे (६०) हे उदय कॉलनी महाले फार्मच्या मागे त्यांच्या घराबाहेर उभे असताना मोटार सायकलीवर संशयित अमोल पिंगळे (Amol Pingale), ओमकार शेलार (Omkar Shelar), सुनील सोनवणे (Sunil Sonawane), कुणाल पाटील (Kunal Patil) हे नशेच्या अवस्थेत आले.

त्यांनी मुकुंदा यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून संशयितांनी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. यांच्यातील एकाने मुकुंदा यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले.

हा प्रकार त्यांच्या घरच्यांनी बघितला असता त्यांनी मुकुंदा यांना वाचविण्याकरिता प्रयत्न करत असतांना संशयितांनी मुकुंदा यांची मुलगी मनीषा मुकुंदा गुडगे (२१) हिच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केले.

तिचा भाऊ सागर मुकुंदा गुडगे (१९) याला देखील दगड मारून जखमी करत मुकुंदा यांची पत्नी रेखा मुकुंदा गुडगे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून घटना स्थळावरून पोबारा केला. दरम्यान जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून रात्री उशिरापर्यंत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.