दोनवाडे शिवारात तीन बिबट्यांचा संचार

शेतकरी भयभीत : वन विभागाकडून पिंजरा तैनात
दोनवाडे शिवारात तीन बिबट्यांचा संचार
file photo

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भगुरजवळील (Bhagur) दोनवाडे शिवारात (Donwade Shivar) शनिवारी (दि.4) रात्री शेतकर्‍यांना एकाच वेळी तीन बिबट्यांनी (Three leopards) दर्शन दिल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी पश्चिम विभागाला तात्काळ याबाबत माहिती दिली...

रविवारी (दि.5) सकाळी बिबट्या जेथे दिसून आला तेथे वन विभागाकडून (Forest Department) पाहणी करण्यात आली. दरम्यान दोनवाडे शिवारात गेल्या तीन चार दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्याने वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच दोनवाडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक बालक व वृद्धाचा वेगवेगळ्या घटनात मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हापासून या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोनवाडेसह आजूबाजूच्या भागात गावातील वस्तीवर राहणार्‍या नागरिकांना बिबट्या दिसून येत आहे. दरम्यान वनविभागाशी यासंबंधी संपर्क साधला असता एकाचवेळी तीन बिबटे नाही तर बिबट्या मादी व तीचे दोन बछडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या भागात बिबट्याचा संचार असल्याचे वनविभागाने म्हंटले आहे. दोनवाडे येथील पाट असलेल्या शिवारात सतत बिबट्या दिसत असल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना भीतीच्या सावटाखाली जावे लागते.

वन विभागाने बिबट्यांसाठी अधिक पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रात्रीच्या वेळी लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, तसेच रात्रीच्या वेळी गाणे लावावे अशा विविध सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com