आठ दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद

आठ दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर त्र्यंबकरोड वरील पिंपळगाव बहुला शिवार परिसरात माजी सभापती सुरेखा गोकुळ नागरे यांच्या मळ्यात गेल्या आठ दिवसात तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

असे अजुन किती बिबटे परिसरात आहेत या चिंतेने परिसरातील शेतकरी ग्रामस्थांमध्ये चिंता आहेत. वनविभाग देखील या बिबट्या जेरबंदीने परीसरातील बिबट्यांच्या संख्येबद्दल आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

सलग दोन दिवसाच्या अंतरालाने दोन बछडे पिंजर्‍यात अडकले होते. आज पिंजर्‍यात अडकलेली एक मादी आहे. ती पिंजर्‍यात शांत बसलेली दिसत असल्यामुळे तिला वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात येत होते.

परिसरात बिबट्याचा मादी व तिन बछडे पाहिल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पून्हा पिंजर्‍यात बछडा सापडण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com