नाशिक | प्रतिनिधी | Nashik
घरी बसून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून नाशिकच्या आडगाव परिसरात (Adgaon Area) राहणार्या एका महिलेची (Woman's) तब्बल तीन लाख पंधरा हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे...
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) विविध आयडीसह व्हाट्सअप क्रमांक धारकावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर ते ०४ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान आडगाव परिसरात महिलेच्या राहत्या घरी घडला.
दरम्यान, योगिता संतोष जाधव असे या महिलेचे नाव असून त्या श्रीराम नगर आडगाव परिसरात राहतात. त्यांना संशयित आरोपीने (Suspected Accused) ऑनलाईन घरी बसून पैसे (Money) कमवण्याचे आमिष दाखवून टेलिग्राम आयडी धारकाने तीन लाख पंधरा हजार रुपयात पैसे भरण्यास लावून आर्थिक फसवणूक केली.