नाशिक । Nashik

संपूर्ण देशभरात अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलनाच्या कामाने वेग घेतला असून नाशिक महानगरातील सोमेश्वर नगरच्या निधी संकलनाचा शुभारंभ झाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक राजाभाऊ मोगल यांच्या कुटुंबीयांनी तीन लाख रुपये निधी देऊन आपल्या दातृत्वाचे पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे.

राजाभाऊ मोगल यांनी एक लाख एक, माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल यांनी एक लाख एक, पुष्कराज राजाराम मोगल यांनी एकावन्न हजार व समृद्ध राजाराम मोगल यांनी एकावन्न हजार रुपये निधीचे धनादेश भाजपा नाशिक महानगराच्या उपाध्यक्ष व नगरसेविका प्रा. डॉ. वर्षा भालेराव यांच्या कडे सुपूर्द केले.

यावेळी मकरंद विद्वन्स, अनिल खांडकेकर, मिलिंद खांडेकर, आदित्य पातोंडीकर, अनिल भालेराव आदी उपस्थित होते. मोगल कुटुंबातील माजी आमदार निशिगंधाताई मोगल यांनी सैनिकांच्या कल्याणासाठी याआधी स्त्रीधन विकून जमा झालेले २१ लाख रुपये देऊन आपल्या दातृत्वाचे दर्शन घडविले होते. यानंतर पुन्हा त्यांच्या कुटुबांने दातृत्वाचे दर्शन घडविले आहे.