विकेंड लॉकडाउनमध्ये साडेतीन लाख दंडाची वसुली

पोलीसांची ३९२ नागरीकांवर कारवाई
विकेंड लॉकडाउनमध्ये साडेतीन लाख दंडाची वसुली

नाशिक । Nashik

शनिवार व रविवार अशा वीकेण्डच्या दोन दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान कोरोना नियम न पाळणार्‍या 392 निष्काळजी नागरीकांवर कारवाई करून 3 लाख 64 हजारांचा दंड वसुल करण्यात आला केला.

विकेण्डला शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली गेली. तरीदेखील बहुतांश ठिकाणी कोरोना नियम न पाळणे, मास्क न लावणे, सामाजिक अंतर न ठेवता नागरिकांचा वावर पोलिसांना आढळून आला. या दोन दिवसांत पोलिसांनी विना मास्क फिरण्यास तसेच सार्वजनिक थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली असली तरीदेखील सर्रासपणे नागरिक रस्त्यावर थुंकत असल्याचे चित्र शहरात आजही पहावयास मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.समाजिक अंतर राखण्याबाबतदेखील काही ठिकाणी उदासिनता पहावयास मिळाली. यामुळे सामाजिक अंतर न राखणार्‍यांविरुध्दही पोलिसांकडून कारवाई केली गेली.

शहरात शनिवारी विना मास्क फिरणार्‍या 201 लोकांवर दंडात्मक कारवाई करत एकुण 1लाख 500 रुपयांचा दंड वसूल केला गेला. सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या 10 लोकांकडून दहा हजारांचा दंड घेण्यात आला तसेच 13अस्थापनांवर पोलिसांनी कारवाई करत 61 हजारांचा दंड ठोठावला.

9 लोकांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 हजार 500 रुपयांचा दंड करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे 7 लोकांकडून 7 हजारांचा दंड वसूल केला गेला. 28 संशयितांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये 4 नागरिक कोरोनाबाधित आढळून आले.

रविवारी मास्क विना वावरणार्‍या 191 लोकांकडून 95 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्स न पाळणार्‍या 16 लोकांवर कारवाई करत पोलिसांनी 16 हजारांचा दंड वसूल केला. वेळमर्यादेसह अन्य कुठलेही नियम न पाळल्याने 19 अस्थापनाचालकांना एकुण 55 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 7 लोकांना दहा हजारांचा दंड ठोठावला गेला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 30 लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

58 जणांची चाचणी

कारण नसताना बाहेर फिरणार्‍या शनिवारी 28 तर रविवारी 30 संशयित नागरीकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये 4 नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. असे नागरीक शहरातील बाजारपेठा, रस्त्यांवर फिरून सुपरस्रेडरचे काम करत असल्याने यांच्यावर नियंत्रण आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

अशी झाली कारवाई

विना मास्क फिरणारे 392 - 1,95,500

सोशल डिस्टन्सचे उल्लघन - 26 - 26,000

आस्थापनांना दंड- 19 - 1,16,500

संचारबंदीचे उल्लंघन करणारे 7 - 17,500

सार्वजनिक ठिकाणी थुंकनारे 9 - 9000

एकुण - 3,64,000

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com