
वणी | वार्ताहर | Vani
येथील वणी-पिंपळगाव रस्त्यावरील (Vani - Pimpalgaon Road) बोराळे फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील (Bike) तिघे जण ठार (killed) झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव रस्त्यावर बोराळे फाट्याजवळ मंगळवार (दि.१४) रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास वणीकडून पिंपळगाव बसवंतकडे (Pimpalgaon Baswant) भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तीसगांवहून वणीला येणाऱ्या मोटरसायकला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोटरसायकलवरील निवृत्ती सखाराम कराटे वय ५५ वर्षे (काका) केदु यशवंत कराटे वय ३५ वर्षे (पुतण्या) संतोष विष्णू कराटे वय ३३ वर्षे (पुतण्या) सर्व रा. तीसगाव, ता. दिंडोरी या काका-पुतण्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. तसेच पोलिस (Police) अज्ञात वाहनाचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.