किल्ले रामशेजवरील साडेतीनशे वर्षीय शिलालेख होतोय जीर्ण

किल्ले रामशेजवरील साडेतीनशे वर्षीय शिलालेख होतोय जीर्ण

बेलगाव कुऱ्हे | Belgaon Kurhe

निसर्गाने दिलेल्या गडकिल्ल्यांचे वरदान महत्वाचे असून ते टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे सदस्य (Shivdurg Sanvardhan Bhramanti Sanstha) महाराष्ट्रात गड किल्यांवर शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी जाते. तेथील वास्तूंचे निरीक्षण या संस्थेमार्फत केले जाते. भ्रमंतीसोबतच तेथील समस्यांना नेहमीच वाचा फोडण्याचे कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जाते...

शिवदुर्ग परिवाराच्या सदस्यांनी देशदूत प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले की, रामशेज किल्याच्या (Ramshej Fort) साडे तीनशे वर्षीय शिलालेखाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. ऐतिहासिक ठेवा असलेल्या रामशेज किल्ल्यावर रणसंग्रामची साक्ष देणारा शिलालेख लुप्त होण्याच्या मार्गावर चालला आहे.

याला कारण म्हणजे येथील राम मंदिरात राहत असलेल्या पुजाऱ्यांनी मंदिराजवळ स्वच्छतागृह बनवल्याने सांडपाणी शिलालेखाच्या आजूबाजूने वाहत असल्याने शिलालेख अतिशय जीर्ण झाला आहे. 1682 मधील असलेला हा शिलालेख झिजला आहे.

याकडे लक्ष दिले नाही तर ऐतिहासिक वारसा नष्ट होईल, त्यामुळे यावर लवकरच तोडगा काढावा, अशी मागणी शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती परिवाराचे शाम गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, बाळा शिंदे, विजय महाले, लखन पाळदे, विजय दराने, किसन थोरात, गणेश कातोरे, पुरुषोत्तम रहाडे, राम दाते, अनिल दाते यांच्या वतीने करण्यात आली आहे.

पौराणिक वास्तूंचे जतन करणे अत्यंत महत्वाचे आहे. रामशेज किल्ल्यावर असलेल्या राम मंदिराजवळ बनवलेल्या स्वच्छतागृह ऐतिहासिक शिलालेख जीर्ण झालेला आहे. शिलालेखाला टिकविणे ही काळाची गरज आहे.

- पवन माळवे, दुर्गसंवर्धक

Related Stories

No stories found.