Video : नाशकाला ऑक्सिजनचे तीन अतिरिक्त टँकर मिळणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
Video : नाशकाला ऑक्सिजनचे तीन अतिरिक्त टँकर मिळणार

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नाशिक दौरा केला.

यावेळी माध्यमांशी बोलतांना फडणवीस यांनी सांगितले की, शहरासाठी आठवड्यातून तीन जास्तचे टँकर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

यासंदर्भात रिलायन्स व जिंदाल यांच्यांशी विभागीय आयुक्तांशी बोलने करुन दिले. रिलायन्सकडून २ तर जिंदालकडून १ ऑक्सिजन टँकर मिळेल. तसेच रेमडेसेवीर जास्तीचे मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

नाशिक व नगर जिल्ह्यातील कोविडचा पॅाझिटीव्हीटी रेट जास्त म्हणजे ३० ते ३२ टक्के आहे. त्यातुलनेत जळगाव, धुळे, नंदुरबारच्या १० टक्के आहे. नाशिकमधील परिस्थिती गंभीर आहे.

आज जिल्हा रुग्णालयात पाहणी करून माहिती घेतल्याचेही त्यांनी सांगितले. नाशिकला बेड्स आवश्यकता आहे.

त्याचप्रमाणे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर तुटवड्याचा प्रश्न गंभीर आहे. रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये, यासाठी आमचा दबाव राहील, असे फडणवीस यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com