पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून; दोघे बेपत्ता, एकजण वाचला

प्रातिनिधीक फोटो
प्रातिनिधीक फोटो

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशकात गेली तीन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. पेट तालुक्यातील एक युवक नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना आणि सप्तशृंगी गड येथील अपघाताची घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील दोन आणि त्र्यंबकमधील एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे...

यातील दिंडोरी तालुक्यातील एकास पोहोता येत असल्याने त्याचे प्राण वाचले असून अन्य दोघे मात्र अद्याप बेपत्ताच आहेत. युद्धपातळीवर शोधकार्य सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे....

अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी काका भोलेनाथ केरु लिलके यांच्या सोबत शेतातील घरी जात होती. आळंदी नदी पार करतांना दोघेही नदीच्या पुरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. तथापी, विशाखा नदीच्या पात्रात वाहून गेली आहे. तिचा शोध घेतला जात आहे.

यासोबतच दुसऱ्या घटनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे तळेगाव येथील पोपट रामदास गांगुर्डे, (वय-37) ही व्यक्ती कालपासून बेपत्ता आहे. ही व्यक्ती किकवी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याचा संशय असून व्यक्त केला जात असून त्याअनुषंगाने प्रयत्न सुरु आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com