देवळालीगाव कोयता हल्ल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात

देवळालीगाव कोयता हल्ल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात

नाशिकरोड |प्रतिनिधी | Nashik Road

मंगळवारी रात्री देवळाली गाव (Deolaligaon) परिसरातील श्री म्हसोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गाडेकर मळ्याजवळील रस्त्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने (Gang) शिबान शेख बबलू या युवकावर तलवारी व कोयते घेऊन हल्ला (Attack) केला होता.

या हल्ल्यात शिबान शेख बबलू हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे (Upnagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांनी वेगाने तपास करत तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

देवळालीगाव कोयता हल्ल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात
Photo Gallery : शालिमार परिसरातील दुकाने मनपाकडून जमीनदोस्त

सदरची घटना घडल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच काही वेळाच्या अंतराने सुंदरनगर येथे सुद्धा संबंधित टोळक्याने तलवारी कोयते व इतर हत्यारे घेऊन दहशत निर्माण करून परिसरातील घरावर दगडफेक (Stone Throwing) करत एका दुचाकी गाडीचे नुकसान केले होते.

देवळालीगाव कोयता हल्ल्याप्रकरणी तिघेजण ताब्यात
लग्नातून पर्यावरणपूरकतेचा संदेश

दरम्यान, त्यानंतर या घटनेची उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गंभीर दाखल घेत वेगाने तपास करून दोन मुलांसह तुषार मस्के नावाच्या युवकास अटक (Arrested) केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com