पर्दाफाश केलेला भोंदू बाबा पोलीस कोठडीत

पर्दाफाश केलेला भोंदू बाबा पोलीस कोठडीत

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या गंगापुर रोड (Nashik Gangapur Raod) या उच्चभ्रू भागात (High Profile Area) एक भोंदू बाबा समस्यांवर उपचार करून लाखो रूपये उकळत होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सापळ्यात हा भोंदू पकडला गेला होता....

गंगापुर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी (Gangapur Police Station) त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. जादूटोणा विरोधी कायदा 3 व भा.दं. वि. 354 या कलमान्वये गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितास आज न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Three Days police custody)

गणेश बाबुराव जोशी असे या भोंदू बाबाचे नाव असुन तो मुळचा मुंदखेडा (Mundkheda), ता- जामनेर , जि- जळगाव (Taluka Jamner, District Jalgaon) येथील रहिवासी आहे.

त्यांची हाय प्रोफाईल (High profile bogus godman) लाईफ स्टाईल (Life Style) आहे. उच्च प्रतिचे वाहने वापरणे, विमानाने प्रवास करणे, उच्चभ्रू लोकांसाठी इंग्रजी वृत्तपत्रात जाहीराती देऊन फसविणे असे काम तो करत होता. देशभर हे फिरत असतात, नाव व मोबाईल नंबर बदलून त्यांचे फसवणूक करण्याचे काम चालू असते अशी माहिती अनिसने दिली.

गंगापुर रोडच्या जेहान सर्कल (Jehan Circle) येथे त्याने भाडेतत्वावर कार्यालय घेतले होते. अनेक दिवसांपासून तो त्या ठिकाणी राहुन लोकांना फसवत होता. लोकांच्या श्रध्देचा फायदा घेत तो अघोरी उपचार सांगत लाखो रूपये लुटत होता.

ही बाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Annis) लक्षात आल्यानंतर आम आदमी पार्टी (AAP) सोबत सापळा रचला व भोंदू बाबाचा भांडाफोड केला. आता भोंदूबाबाच्या कार्यालयात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास त्याची तपासणी करणे, त्याच्या साथीदारांची माहिती मिळवणे या बरोबरच त्यांचे रॅकेट शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे.

अशी कुणाची फसवणूक झाली असल्यास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन डाॅ टी.आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, अॅड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे ,जितेंद्र भावे, कस्तुरी आटवणे, जगदीश आटवणे, सोमा कुर्हाडे आदींनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com