नविन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

नाशिक महानगरपालिका अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र नवीन नाशिक आयोजित सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन मॉडर्न शाळा शिवाजी चौक येथे करण्यात आले.

या शिबिरात एमडी मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व मोफत उपचार तसेच औषधे यांचा लाभ मिळणार आहे. आज ( दि.30 ) हे मोफत शिबिर डॉ. हेडगेवार सभागृह, त्रिमूर्ती चौक, व (दि. 31) रायगड चौक मनपा शाळा याठिकाणी होणार आहे.

नवीन नाशकातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त तथा नवीन नाशिक विभागिय अधिकारी डॉ. मयूर पाटील, डॉ. अजिता साळुंखे , नगरसेवक राजेंद्र महाले, नगरसेविका छाया देवांग, डॉ. कुणाल पवार, डॉ. प्राजक्ता कडवे, डॉ. नृत्या चव्हाण, दिलीप देवांग आदींसह सर्व सेवक उपस्थित होते.

या सर्वरोग निदान शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित असणार आहेत. महिलांना मोठ्या प्रमाणावर हिमोग्लोबिनची कमतरता आढळून येत असल्याने भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी महिलांनी मोठया संख्येने या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.

डॉ. मयूर पाटील सहाय्यक आयुक्त